बिग बॉसमधील स्पर्धकावर Salman Khan फिदा, काढून दिली स्वत:ची सर्वात जवळची गोष्ट
ज्याचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक कलाकारांचे करिअर बनवलं आहे. त्याने अनेक अभिनेत्रींना इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केलं आहे. त्यांच्यासोबत सिनेमांमध्ये काम करत करिअर सुरु करण्याची संधी दिली आहे.
सलमानला जेव्हा एखादी व्यक्ती कष्टाळू वाटते किंवा आवडते. तेव्हा तो त्या व्यक्तीची मदत करण्यासाठी आपले सगळे प्रयत्न करताना दिसतो. असंच काहीसं बिग बॉसमधील एका स्पर्धकासोबत घडलं
प्रतीक सहजपालने 'बिग बॉस 15' ची ट्रॉफी जिंकली नसली तरी त्याने लाखो लोकांची मने नक्कीच जिंकली आहेत. तो फर्स्ट रनर अप होता. टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार प्रतीकला सपोर्ट करताना दिसले आणि तो खरा विजेता असल्याचं म्हटलं आहे.
यामध्ये गौहर खान, काव्या पंजाबी आणि बिपाशा बसू यांचा समावेश आहे. प्रतीकला लोकांकडून जेवढे प्रेम मिळत आहे त्यामुळे तो खूप खूश आहे. आता त्याला सलमान खानकडून एक खास भेट मिळाली आहे, सलमान खानने अगदी जवळची गोष्ट प्रतीकला दिली आहे. आणि ही प्रतिकसाठी खूप खास ठरणार आहे.
ज्याचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने सलमानचे आभारही मानले आहेत.
प्रतीकने सलमान खानसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. सलमानने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी जीन्स घातली आहे तर प्रतीकने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घातली आहे.
बिग बॉस नंतरच्या पार्टीचा हा फोटो आहे. प्रतीकने सांगितले की, सलमानने त्याला एक टी-शर्ट गिफ्ट केलं आहे. त्याने लिहिले- 'भाई खूप प्रेम आणि समर्थन, टी-शर्टसाठी धन्यवाद. मला आशा आहे की तुम्हाला माझा अभिमान वाटेल. तुमचा विश्वास मिळवणे हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.