मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत. बऱ्याच काळानंतर हे दोघे मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने  'टायगर जिंदा है' या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची तारीख समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' या चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. या चित्रपटात सलमान बरोबर अभिनेत्री कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. 'टायगर जिंदा है' हा चित्रपट २०१२ मधील 'एक था टायगर' चा सिक्वेल आहे. फॅन्सना लागलेली उत्सुकता लक्षात घेऊन सिनेमाचा थीम टिझर शुक्रवारी पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये सलमान आणि कॅटरीना यांची पोझ बघून तरी यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 'टायगर जिंदा है' च्या अधिकृत ट्विटर पेजवर दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा ट्रेलर ७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.


'टायगर जिंदा है' या सिनेमाचे बॅकग्राऊंड म्यूझिक  'एक था टायगर' ची आठवण देते. कतरीना आणि सलमान दोघेही गोळीबार करताना या सिनेमात दिसत आहेत. विशेषत: कॅटरीनाची भूमिका मागील सिनेमापेक्षा हटके असणार आहे. यामध्ये ती जास्त अग्रेसिव्ह दिसत आहे.