सलमानच्या आयुष्यात `जुनं प्रेम` परतणार; निमित्तही खास आहे, पाहा
सलमान आणि शाहरुख हे `पठान` आणि `टायगर 3` या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान (Bollywood's Bhaijaan) अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखच्या (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathan) या चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून सलमान आणि शाहरुख बऱ्याच काळानंतर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. याशिवाय, सलमानच्या 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण यावेळी कोणता अभिनेता नाही तर सलमानचं जुनं प्रेम त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आता हे जुनं प्रेम कोण आहे असा प्रश्न असताना या दोन अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींचे नाव भाग्यश्री (Bhagyashree) आणि भूमिका चावला (Bhumika Chawla) आहे. भाग्यश्री आणि भूमिका या दोघी सलमानसोबत 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या आगामी चित्रपटात दिसणार आहेत.
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Release On Eid) चित्रपट 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जस्सी गिल (Jassie Gill) , शहनाज गिल (Shehnaaz Gill) , राघव जुयाल (Raghav Juyal) , सिद्धार्थ निगम (Siddharth Nigam) आणि विजेंदर सिंग (Vijender Singh) हे कलाकार दिसणार आहेत. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, सलमान भाग्यश्री आणि भूमिका चावलासोबत 'किसी का किसी का भाई किसी की जान'साठी पुन्हा एकत्र येणार आहे. सलमाननं 'मैने प्यार किया'मध्ये भाग्यश्रीसोबत काम केले होते, तर भूमिकासोबत 'तेरे नाम' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
रिपोर्टनुसार, 'पठाण' प्रदर्शित झाल्यानंतर लवकरच शाहरुख खान 'टायगर 3' चे शूटिंग करणार आहे. आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सच्या ग्रँड फिनालेच्या तयारीसाठी शाहरुख, सलमान आणि हृतिक सतत एकत्र येत आहेत. एकीकडे सलमान 'पठाण'मध्ये दिसणार असताना आता शाहरुखही 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. 25 जानेवारी 2023 रोजी पठाण रिलीज झाल्यानंतर लवकरच या थरारक चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan This Two Actress Will Share Screen With him After Long Time )