मुंबई : अभिनेता सलमान खान म्हटलं तर चर्चा होणारचं. सलमान नुकताचं बाब सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये पोहोचला होता.  बाबा सिद्दीकी प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या वर्षी देखील त्यांच्या इफ्तार पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली... अभिनेता शाहरुख खान, सलमान खान  यांसारखे अनेक कलाकार  इफ्तार पार्टीमध्ये उपस्थितीत होते. इफ्तार पार्टीचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण त्यामधील एक व्हिडीओ मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बाबा सिद्दीकी सतत सलमानला किस करताना दिसत आहे. सलमान आणि बाबा सिद्दीकी यांचा व्हिडीओ वूम्प्ला या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बाबा सिद्दीकी सलमानला सोडायला त्याच्या कार पर्यंत आले, तेव्हा ते सलमानच्या कारच्या खिडकीतून अभिनेत्याला मिठी आणि किस करताना दिसत आहेत. 


सांगायचं झालं तर,  अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. या पार्टीचं खास आकर्षण म्हणजे सलमान आणि शाहरूख खान. सलमान आणि शाहरूखमधील दरी याच इफ्तार पार्टीत संपल्याचं सर्वश्रूत आहे. त्यामुळे या इफ्तार पार्टीची दरवर्षी जोरदार चर्चा होते. यंदाही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीला पोहोचले होते.


सलमानसोबत वडील सलीम खान, सोहेल खान, अरबाज खान, अलवीरा खान आणि तिचा पती अतुल अग्निहोत्रीही इफ्तार पार्टीला पोहोचले. मिस युनिवर्स 2021 हरनाज संधूनेही इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. इफ्तार पार्टीची ही रात्र सेलिब्रिटींमुळे चमकत होती.