मुंबई : 2007 मध्ये सलमान खानने  दिग्दर्शक विलार्ड केलरच्या मॅरीगोल्ड चित्रपटात काम केलं होतं. हा एकमेव चित्रपट आहे ज्यात सलमानने हॉलिवूड दिग्दर्शकासोबत काम केलं आहे. भारतीय आणि अमेरिकन चित्रपटांमधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने विलार्डने हा चित्रपट बनवला. ज्याचं शूटिंग आग्रासह राजस्थान, मुंबई आणि गोव्यात झालं आहे. ताजमहाल भेट म्हणून देण्याचं हे प्रकरण चित्रपटाची हिरोईन अली लार्टरशी संबंधित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताजमहलचा शोध
शूटिंगदरम्यान अली लार्टरसोबत सलमानची चांगलीच मैत्री झाली होती. अली लार्टर अमेरिकेत राहते. आग्रा येथे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अली ताजमहालचे सौंदर्य पाहून दंग झाली होती. तिने ताजमहालसमोर सलमान आणि शूटिंगच्या इतर सदस्यांसोबत अनेक फोटोज घेतले. नंतर, तिला ताजमहालच्या मॉडेलसोबत घेवून जायचं असल्याने तिने स्थानिक मार्गदर्शकासह आग्रा मार्केटमध्ये प्रवास केला. पण खूप शोधाशोध करूनही तिला खरा संगमरवरी ताजमहाल कुठेच सापडला नाही आणि त्यामुळे ती खूप निराश झाली.


सलमानला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने ताजमहालच्या मॉडेलची व्यवस्था अलीसाठी केली. आग्रामध्ये सलमानची बरीच ओळख होती. याच ओळखीमुळे सलमानच्या एका फोनवर ताजमहालचे मॉडेल तयार करण्यात आलं. अली अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी सलमानने तिला एक सुंदर गिफ्ट पॅक दिलं होतं. ते मिळाल्यानंतर अलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.


कोरिओग्राफर बनला सलमान
चित्रपटाची कथा मॅरीगोल्ड लेक्सटन या तरुण मुलीची आहे. जी शॉर्ट फिल्म शूट करण्यासाठी भारतात येते. इथे मुंबईत तिला मोठा चित्रपट मिळतो. पण समस्या अशी असते की मॅरीगोल्डला कसं नाचायचे ते माहित नसतं. त्यानंतर ती कोरिओग्राफर बनलेल्या सलमानला भेटते. जिचं नंतर प्रेमात रुपांतर होतं. दोन तासांच्या या चित्रपटात जावेद अख्तरने लिहिलेली आणि शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेली सात गाणी होती.