मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तो लवकरच चाहत्यांसाठी त्याच्या अनेक चित्रपटांची भेट घेऊन येणार आहे. दरम्यान, सलमान खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्याने त्याच्या बहुचर्चित 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. अभिनेत्री पूजा हेगडे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. पूजा हेगडे सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपला खास फोटो शेअर करून तिने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. पूजा हेगडे सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पूजा हेगडे खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून केस मोकळे सोडले आहेत.


विशेष म्हणजे, फोटोमध्ये पूजा हेगडेच्या हातात सलमान खानचे आवडतं ब्रेसलेट दिसत आहे. फोटोत ती अभिनेत्याचं ब्रेसलेट फ्लॉंट करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत पूजा हेगडेने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'शूटिंग सुरू झालं.' पूजा हेगडेचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. यासोबतच ती 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटासाठीही उत्सुकता व्यक्त करत आहे.



मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, सलमान खान आणि पूजा हेगडेसोबत, बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ती आयुषसोबत दिसणार आहे. या बातमीने चाहते खूप आनंदी आहेत. अलीकडेच आयुष शर्माने पुष्टी केली होती की तो कभी ईद कभी दिवालीचा भाग होणार आहे.