मुंबई : सलमान खानला वाढदिवसाआधी साप चावल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर सलमानची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे. तर सलमानला चावणाऱ्या सापालाही रेस्क्यू करण्यात आलं आहे. सलमान खानवर ही काही पहिल्यांदाच अशी वेळ आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा दबंग स्टार भाईजान सलमान खान याआधी देखील अनेकदा वेगवेगळ्या अपघातातून वाचला आहे. आज आपण सलमान खान आणि त्याच्यासोबत घडलेल्या अपघातांबाबत जाणून घेणार आहोत. 


तेरे नाम सेटवर दुर्घटना


ब्लॉकबस्टर हिट सिनेमा सलमान तेरे नाम आणि त्यातली गाणी सर्वांनाच आवडली होती. आजही अनेकांच्या तोंडावर या सिनेमातील गाणी असतात. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमानसोबत एक दुर्घटना घडली होती. 


एका शॉटमध्ये सलमानला ट्रेनच्या ट्रॅकवरून चालायचं होतं. त्याचवेळी भरधाव वेगात असणारी ट्रेन त्याच्या मागून येत होती. त्याच वेळी एका को स्टारने त्यांना धक्का दिला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. को स्टारमुळे सलमानच्या जीवावर आलेलं संकट टळलं. 


सूर्यवंशी सेटवर हल्ला


बिग बॉस 15 दरम्यान बिग पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी आलेल्या रणवीर सिंहने याबाबत किस्सा सांगितला होता. सूर्यवंशी सिनेमात सलमानला चित्त्यासोबत सिन करायचा होता. या फाइट सीन दरम्यान चित्त्याची सर्व नखं कापली होती. पण ज्यावेळी क्लोज अप शुटिंगची वेळ आली त्यावेळी चित्त्याची नखं पुन्हा वाढलेली होती. 


शूटिंग दरम्यान या चित्त्याने सलमान खानवर हल्ला केला होता. सलमानच्या पाठीवर अनेक वार केले होते. सलमान खानला चित्त्याच्या हल्ल्यातून वाचवण्यात आलं होतं. 


ट्यूबलाइट शूटिंग दरम्यान दुर्घटना 


2016 मध्ये या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान नदीमध्ये घसरून पडला. नदीमधून वाहून जात असताना सलमानला रेस्क्यू करण्यात आलं. त्यावेळी दुर्घटनेतून तो बचावला. 


फार्म हाऊसवर चावला साप


सलमानला वाढदिवसापूर्वी फार्म हाऊसवर सापाने दंश केला. 3 वाजण्याच्या सुमारास सापाने दंश केला. त्यानंतर सलमान खान रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं.