Salman Khan Video: बॉलिवूड अभिनेता दंबग खान (Dambag Khan) कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतो. यंदा सलमान खान (Salman Khan) चर्चेत आला तो अभिनेत्री पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) वाढदिवसाने. पूजा हेगडेचा बर्थडे केक कापताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपले आवडते अभिनेता किंवा अभिनेत्री घरात कशा असतात काय काय करतात, हे जाणून घ्यायला खूप आवडतं. म्हणून बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांचे अनेक व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर (Social media) वाऱ्यासारखे पसरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. दिवाळीत आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवतो. सलमान खान यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सल्लू मियांच्या आयुष्यात काय काय होतं हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. जेव्हा सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा तो काय करतो हे दाखवणारा एक्स्क्युझिव्ह व्हिडीओ (Excusive video) आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. (Salman Khan Playing With Nephews Arhaan and Nirvaan nmp)


दबंग खान चाचूच्या भूमिकेत असतो...


सलमान खान जेव्हा घरी असतो तेव्हा तो खूप मस्ती करतो. सलमान खान, सोहेल खान (Sohail Khan) आणि अरबाज खान (Arbaaz Khan)ही भांवड जेव्हा एकत्र येतात घरात एकच धमाल असते. अरबाज आणि सोहेलची मुलं म्हणजे सलमान आपल्या पुतण्यांसह खूप वेगवेगळे गेम खेळतो. या आनंद क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. सलमान खान यांचं अरहान (Arhaan)आणि निरवान (Nirvaan) यांच्यासोबत खूप खास बाँडिंग आहे. या व्हिडिओमध्ये सलमान आणि अरहान-निरवान 'हँड स्‍लॅप' (Hand slap) हा खेळ खेळताना रेफरीच्या भूमिकेत दिसत आहे.



या व्हिडीओमध्ये पुढे सल्लूमिया स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना. जिममध्ये व्यायाम करताना दिसतो आहे. सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत भरपूर वेळ घालवतो. तो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असला तरी जेव्हा जेव्हा त्याला शक्य आहे तो घरी असतो. खास करुन सणासुदीला सल्लूमियां आवर्जून घरी असतो. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवात भाईजान खास गणपतीसाठी बहीण अर्पिता खानच्या (Arpita Khan) घरी गेला होता. त्यावेळीही बाप्पाची आरती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (video Viral) पाहिला मिळाला होता.