मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल अखेर विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची तयारी अखेरच्या टप्प्यात आली आहे. डिझायनर कपडे, सजावट, पाहुण्यांची यादी या साऱ्यावर शेवटची नजर टाकली जात आहे. मुख्य म्हणजे आता या दोघांचे कुटुंबीयसुद्धा विवाहस्थळी म्हणजेच जयपूरमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाच्या लग्नात पाहुण्यांच्या रुपात कोणकोण दिसणार, याचीच चाहत्यांना उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे सलमान या विवाहसोहळ्यात गैरहजर असणार आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार सलमानला या लग्नाचं आमंत्रण नाही. असं असलं तरीही सलमान तिथं अनपेक्षितपणे त्याचं कर्तव्य बजावणार आहे. 


सलमानचा खासगी सुरक्षारक्षक अर्थात पर्सनल बॉडीगार्ड असणारा शेरा कतरिनाल्या लग्नादरम्यान सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पाहणार आहे. 


शेराची स्वत:ची सिक्युरिटी एजन्सी आहे. टायगर सिक्युरिटी असं त्या कंपनीचं नाव आहे. शेराच्याच खांद्यांवर सिक्स सेन्स फोर्टच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असणार आहे. 


कतरिना आणि विकीच्या विवाहसोहळ्यामध्ये बरवारा पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. 


बॉलिवूडमधील अतिशय चर्चेत असणाऱ्या या जोडीच्या विवाहसोहळ्यासाठी अनेक कलाकारांची उपस्थिती असणार असल्याचं कळत आहे. ज्यामुळे तिथे सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे. 


सुरक्षेच्या बदोबस्तासाठी थेट भाईजानचा खास माणूसच तिथे पोहोचणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळं एका अर्थी सलमान मित्र म्हणून कतरिनाला ही मदत करत असावा असाच अंदाज चाहत्यांनी लावला आहे.