`या` ठिकाणी होणार सलमान खानच्या `सिकंदर` चं शूट; भाईजानचं आहे खास कनेक्शन
Salman Khan : सलमान खान ज्या ठिकाणी करणार `सिकंदर` चं शूट त्या ठिकाणाशी खान कुटुंबाचं आहे खास कनेक्शन...
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये पोहोचला आहे. 2025 मध्ये ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ज्या ठिकाणी होत आहे त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या शाही महालानं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सिकंदर'ची शूटिंग सुरु झाली आहे. त्याच्या आधल्या दिवशी या चित्रपटाची टीम ही इथे पोहोचली आहे. पण तुम्हाला माहितीये का सलमानसाठी हे ठिकाण खूप खास आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची बहीण अर्पिता आणि आयुष शर्माचं लग्न याच ठिकाणी झालं.
दरम्यान, या ठिकाणी शूटिंगला येण्या आधी सलमान खानसोबत विमानतळावर भली मोठी सिक्योरीटी आली होती. गेल्या महिन्यात 12 तारखेला सलमान खानचे जवळचे व्यक्ती बाबा सिद्दीकीला गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यानंतर सलमान खानच्या आजुबाजूला सिक्योरिटी वाढवली आहे. कारण बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचं लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगनं मान्य केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर सगळ्यांनी चेतावनी दिली आहे. सलमान खानला सतत मारण्याची धमकी मिळते. या प्रकरणात पोलिसांनी नोएडामधून एका तरुणाला अटक केली. तर दुसऱ्याला वांद्रेतून अटक केली.
हेही वाचा : 'प्रॉपर्टीची वाटणी कशी होणार?'; 2 नोव्हेंबरच्या सकाळी शाहरुखसोबत काय झालं! मुलांविषयी सांगितली 'ही' गोष्ट
सलमानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाच्या शेवटी सलमानची चुलबूल पांडेच्या भूमिकेत एन्ट्री दाखवली आहे. तर सध्या तो 'सिकंदर' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉसनं केलं आहे. चित्रपटात रश्मिका मंदाना, सुनील शेट्टी आणि काजल अग्रवाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आता सलमानच्या पुढच्या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार. त्यात काय वेगळेपण असणार किंवा कशा प्रकारे सगळे याकडे पाहतात या सगळ्या गोष्टींकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.