...म्हणून सलमानने अशी मिटवली प्रेमाची खूण
‘मैने प्यार किया’चित्रपटातील किंसिंग सीन त्यावेळी चांगलाच गाजला होता.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान देखील सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करत आहे. आता देखील त्याने एक अनोखी शक्कल लढवत कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा चाहत्यांना दिला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमानने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील किसिंग सीनला एक नवा ट्विस्ट दिला आहे.
सलमानचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सलमान आणि भाग्यश्री स्टारर ‘मैने प्यार किया’चित्रपटातील किंसिंग सीन त्यावेळी चांगलाच गाजला होता. आता हाच सीन सलमानने पुन्हा रिक्रिएट केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.
या व्हिडिओमध्ये चित्रपटातील मूळ सीन दाखवण्यात आला आहे. त्यानंतर आता सलमानच्या हातात अचानक सॅनिटाइजर येतो आणि तो त्या काचेवरील लिपस्टिकचा डाग पुसून टाकतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पोट धरून हसायला भाग पाडेल हे मात्र नक्की. या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट देखील केली आहे.
सलमान सध्या त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. लॉकडाऊनमुळे त्याने त्याचा आगामी चित्रपट 'राधे'ची शूटींग थांबवली आहे. शिवाय या कठिण समयी तो अनेकांची मदत देखील करत आहे.