सलमानने अनिल कपूरमुळे नाकारला सिनेमा
जाणून घ्या पूर्ण प्रकरण
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लवकरच आपल्या चाहत्यांकरता 'दबंग 3'हा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाबरोबरच सलमान खान ईदच्या निमित्ताने 'किक' हा सिनेमा देखील प्रेक्षकांसाठी रिलीज होत आहे. हे सगळे सिक्वल बघता आता सगळ्यांच लक्ष हे सलमान खानच्या 2005 मध्ये आलेल्या 'नो एन्ट्री' सिनेमाकडे आहे.
पण आता असं वाटतंय की, चाहत्यांना या सिनेमाकरता थोडी नाराजीच सहन करावी लागणार आहे. सलमान खानने या सिनेमाला शूट करण्याबाबत नकार दिला आहे.
पिंकविला वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानसोबत या सिनेमात अनिल कपूर देखील दिसणार आहे. पण हे दोघेही आधीच्या कमिटमेंटमुळे व्यस्त आहेत. एकमेकांच्या तारखा जुळत नसल्या तरीही अनिल कपूर यांच्याशिवाय सिनेमा शूट न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सलमानने अनिल कपूरमुळे हा सिनेमा शूट करण्यास नकार दिला आहे.
2005 मध्ये रिलीज झालेल्या 'नो एन्ट्री' सिनेमाने 14 वर्षे पूर्ण केली आहेत. याबाबत निर्माता बोनी कपूर म्हणाले की, 2005 मधील सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला आहे. तसेच या सिनेमाने आता 14 वर्षे पूर्ण केली आहेत. हा सिनेमा भाग 2 च्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.