सलमान खानने नाकारली रेस 3 मधील `ही` भूमिका
`टायगर जिंदा है` या चित्रपटाच्या शुटिंग नंतर सलमान खान आता कोणता प्रोजेक्ट करणार याबाबत खूप चर्चा होती.
मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या शुटिंग नंतर सलमान खान आता कोणता प्रोजेक्ट करणार याबाबत खूप चर्चा होती.
बिग बॉसच्या बरोबरीने सलमान 'रेस 3' हा सिनेमा हातात घेणार आहे. पण या चित्रपटामध्ये सलमान खानने नकारात्मक भूमिका साकारावी अशी काहींची इच्छा होती. मात्र सलमान खानने ती धुडकावून लावल्याची माहिती बॉलिवूडलाईफ.कॉमने दिली आहे.
सलमान खानने यापूर्वीही कधीच खलनायकाची भूमिका साकारलेली नाही. त्याच्यामते, त्याच्या फॅन्सवर त्याच्या भूमिकांचा प्रभाव पडतो. सलमान खानला त्याच्या फॅन्समध्ये चांगल्या भूमिकांचाच प्रभाव पडावा असे वाटते.
'बाजीगर' हा चित्रपट शाहरूखपूर्वी सलमान खानला ऑफर करण्यात आला होता. मात्र भूमिका नकारत्मक असल्याने सलमान खानाने तेव्हादेखील हा सिनेमा नाकारला होता. 'बाजीगर' या चित्रपटाने शाहरूखला हिंदी सिनेमात ओळख मिळाली.
रेस 3 मध्ये सलमान खान एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. तर खलनायकाची भूमिका सलमान खानचा मित्र आदित्य पांचोली साकरण्याची शक्यता आहे.
रेमो डिसुजा दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉबी देऑलदेखील झळकणार आहे. रेस 3 हा अॅक्शनपॅक्ट चित्रपट आहे.