मुंबई : सेलिब्रिटी असो किंवा मग सर्वसामान्य लोक नशीबावर प्रत्येकाचा विश्वास असतोच. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो त्याचं गूडलकं त्याच्यासोबत ठेवतो.  सलमानचं गूडलक म्हणजे त्याचं ब्रेसलेट कित्येक वर्षांपासून सलमान त्याच्या हातात निळा खडा असलेलं हे ब्रेसलेट घालून आले. लक्षवेधी गोष्ट म्हणजे, चित्रपटाचं शुटिंग सुरु असतानाही तो हे ब्रेसलेट कधीच त्याच्या हातातून काढत नाही. त्यामुळे हे ब्रेसलेट सलमानसाठी इतकं खास का आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. या प्रश्नाचं सलमाननं एका कार्यक्रमात उत्तर दिलं होतं, त्याचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमाननं त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, तेव्हा पासून हे ब्रेसलेट त्याच्या हातात आहे. हे ब्रेसलेट त्याच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान यांनी त्याला दिलं होतं. विशेष म्हणजे वडिलांनी दिलेलं हे ब्रेसलेट सलमानला निगेटिव्ह एनर्जीपासून दूर ठेवतं असा त्याचा विश्वास आहे.



सध्या सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ब्रेसलेटविषयी भाष्य केलं आहे. 'माझे वडील सलीम खान कायम हे ब्रेसलेट परिधान करायचे. त्यांच्या हातात हे फार कूल दिसायचं. लहान असताना मी या ब्रेसलेटसोबत कायम खेळायचो. ज्यावेळी मी फिल्मी करिअरला सुरुवात केली त्यावेळी सेम तसंच ब्रेसलेट त्यांनी मला भेट दिलं',असं सलमान म्हणाला.


पुढे सलमान म्हणाला, 'या ब्रेसलेटमध्ये असलेल्या खड्याला फिरोजा म्हणतात. दोनच लिव्हिंग स्टोन आहेत. एक अकीक आणि दुसरा फिरोजा (turquoise). त्यापैकी फिरोजा माझ्याकडे आहे. या खड्याला नकारात्मक ऊर्जा लगेच जाणवते. त्यामुळे जेव्हा कधी माझ्यासोबत काही चुकीचं किंवा नकारात्मक होणार असेल त्यावेळी हा खडा आपोआप तुटतो. हा माझा 7 वा खडा आहे.'


दरम्यान, 'वॉटेंड', 'दबंग', 'तेरे नाम' अशा कितीतरी चित्रपटांमध्ये सलमानच्या हातात हे ब्रेसलेट पाहायला मिळालं आहे. सलमान कधीच त्याचं ब्रेसलेट हातातून काढत नाही. सलमान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच तो 'पठाण' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच 'टायगर 3' मध्ये तो कतरिना कैफसोबत झळकणार आहे. याशिवाय त्याचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपटही लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.