Salman Khan's old video : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना एक मुलगी असून आराध्या तिचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तरी देखील हे जोडपं एकत्र त्यानंतरही स्पॉट झालं. या सगळ्यात आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो त्याची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच ऐश्वर्याच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, जेव्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचं लग्न झालं तेव्हा सलमान खानविषयी खूप चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यात असं म्हटलं जात होतं की त्याला ऐश्वर्याच्या लग्नानं खूप वाईट वाटलं. मात्र, हे काही तरी वेगळंच आहे. त्यानंतर सलमानची त्यावर रिअॅक्शन समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या घटस्टोटाच्या चर्चांमध्ये तोच व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडीओवर सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नावर बोलतोय. 


सलमाननं इंडिया टिव्हीच्या ‘आपकी अदालत’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्या दरम्यान, त्यानं ऐश्वर्या रायच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. सलमान खानविषयी जिथे चर्चा होती की 'तो त्याच्या एक्सच्या लग्नानं नाराज आहे.' मात्र, जेव्हा त्याला विचारलं तर तेव्हा तो म्हणाला की 'तो आनंदी आहे. त्याची तर इच्छा आहे की त्याची एक्सनं कायम आनंदी रहावं. तर त्याला असलेला आनंद व्यक्त करत तो म्हणाला की इतके वर्ष झाले. त्याला आनंद आहे की ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न केलं.' त्याचं म्हणणं आहे की 'अभिषेक तिच्यासाठी असलेला योग्य वर आहे. तर त्याचं म्हणणं आहे की कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटतं की त्याची गर्लफ्रेंड आनंदी रहायला हवी.' त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. 


हेही वाचा : ...जेव्हा बॉबी देओलवर सासऱ्यांची 300 कोटींची संपत्ती हडपण्याचा आरोप झाला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?


सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात शेवटी तो 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसली होती. त्याशिवाय तो सध्या ‘बिग बॉस 17’ चा सुत्रसंचालन करताना दिसतोय. 28 जानेवारी रोजी त्याचा फिनाले आहे. त्याशिवाय त्याच्याकडे आता अनेक प्रोजेक्ट असून तो करण जोहरच्या ‘द बुल’ मध्ये देखील दिसणार आहे.