मुंबई : अलीकडेच बिग बॉस 15 च्या शुटमधून अभिनेता सलमान खान फ्री झाला आहे. या शोदरम्यान अभिनेता रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याच्या चाहत्यांना कळालं. परंतु ती व्यक्ती किंवा ती मुलगी कोण आहे, जिची इतके वर्ष भाईजानने वाट पाहिली असा लोकांना प्रश्न पडला आहे. ज्यामुळे लोकं सलमान खानची दुल्हनीया पाहण्यासाठी उत्सुक्त आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान सलमान खानचा एका मुली सोबतचा फोटो व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर बिग बॉस 15 होस्ट करताना शहनाज गिलसोबत झालेल्या संवादात सलमान म्हणाला की, जेव्हा तो आता सिंगल नाही. परंतु या व्यतिरीक्त भाईजानने पुढे काहीही सांगितले नाही किंवा त्याच्या लेडी लव्हबद्दल कोणताही इशारा दिला नाही, पण आता बिग बॉस संपल्यानंतर सलमानचा एक फोटो समोर आला आहे जो तीन फोटोंचा कोलाज आहे. या फोटोमध्ये भाईजान मुलीसोबत दिसत आहे.


फोटोतील ही मुलगी ओळखीचा चेहरा नाही, म्हणजेच ती, मॉडेल किंवा अभिनेत्री असल्याची शक्यता फार कमी आहे. पण सलमान तिला चांगला ओळखतो, हे या फोटोवरुन समजते. 


हा फोटो पायल विजय शेट्टी अशा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या मुलीने एका फोटोत सलमानसोबत सेल्फी घेतला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये भाईजानने पायलच्या गळ्यात हात घातला आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये तो तिला किस करत आहे. 


कोलाज शेअर करताना पायलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आयी ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे क़रीब है.' पुढे सलमानला टॅग करत ती म्हणाली अशा अप्रतिम यजमानासाठी खूप खूप धन्यवाद.


आता फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील, तर अनेकांनी मनात हे ठरवून मोकळे झाले असतील की, हिच ती मुलगी आहे, जिच्या प्रेमात भाईजान आहे.



परंतु असे नाही. ही मुलगी बिग बॉस 15 मधील कंटेस्टंट विशाल कोटियानची गर्लफ्रेंड आहे. बिग बॉस संपल्यानंतर पायल आणि विशाल सलमानशी बोलले आणि त्याच्यासोबत पार्टी देखील केली. त्या दरम्यानचा हा फोटो आहे. जो पायलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


पायलच्या या फोटोवर कमेंट करत विशालने लिहिले आहे की, 'असे दिसते की, आता मला अजय देवगण व्हावे लागेल'.


अजय देवगण आणि सलमानने हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम केले होते आणि या चित्रपटात ऐश्वर्या राय देखील होती. ज्यामध्ये अजय देवगन सलमान खानला भेटवण्यासाठी ऐश्वर्याला घेऊन जातो.