नवी दिल्ली : बॉलिवूडच्या सुलतानने नुकतचं आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. जर तुम्हीही 'बजरंगी भाईजान'चे चाहते आहात तर तुम्हाला हे सरप्राईज नक्कीच आवडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता सलमान खान, अरबाज खान, अलवीरा आणि सोहेल खान दिसत आहेत.


या फोटोची खासियत म्हणजे हा फोटो त्यांच्या लहानपणीचा आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, अभिनेता सलमान खान आणि अरबाज एकत्र उभे आहेत आणि त्यांच्या बाजुला बहीण अलवीरा आहे. तर सर्वात शेवटी सोहेल खान उभा आहे.



सलमान खानने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि त्याचे हात पाठीमागे आहेत.