मुंबई : भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात कॉन्ट्रोवर्शियल शो 'बिग बॉस' लवकरच छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. या शो बाबत सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या शो ला अधिक मसालेदार करण्यासाठी मेकर्स शो मध्ये भरपूर बदल करत असतात. आता या शो संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून 'बिग बॉस' ची ओपनिंग सेरेमनी ही लोणावळ्यात होते. पण आता याची जागा बदलण्यात आली आहे. आता ही ओपनिंग सेरेमनी गोव्यात होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस 12 बद्दल जी माहिती मिळत आहे. त्यामध्ये ही ओपनिंग सेरेमनी लोणावळ्याच्या ऐवजी गोव्यात होणार आहे. तसेच इथेच शो संदर्भातील प्रेस कॉन्फरन्स देखील घेण्यात येणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत शो तील स्पर्धक आणि कार्यक्रमातील वेगवेगळे नियम, खेळ सांगण्यात येणार आहे. 


बिग बॉस 12 हे सिझन 16 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. आता शो चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या शोमध्ये होस्ट म्हणून आपल्याला सलमान खान दिसणार आहे. या प्रोमोत इलेक्ट्रिशयन - रॅपर, सासू - सून, जुळ्या बहिणी आणि लहान - मोठ्या जोड्या असल्याच दाखवण्यात आलं आहे.