मुंबई : सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे. अर्पिता आणि आयुष जवळपास ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अर्पिता आणि आयुष ४ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दुसऱ्या बाळाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सलमान पुन्हा एकदा मामा होणार असल्याचं बोललं जात आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल मुलगा आहे.




सलमान त्याच्या भाच्यासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमानच्या चित्रपटांच्या सेटवर अनेकदा आहिलला पाहण्यात आलं आहे. 




अर्पिता आणि आयुष यांचा १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये हैदराबादमध्ये विवाहसोहळा पार पडला. गेल्या वर्षी लवयात्रि चित्रपटातून आयुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.