`हा कोणाचं ऐकत नाही, ऐकलं असतं तर...`, अरबाजच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला सलमान
Salman Khan on Arbaaz Khan`s wedding : सलमान खाननं पहिल्यांदाच अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
Salman Khan on Arbaaz Khan's wedding : 'बिग बॉस'चा 17 वा सीझनला त्याचा विजेता मिळण्याआधी स्टेजवर सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान स्टेजवर खूप मस्ती करताना दिसले. जेव्हा अरबाज खान आणि सोहेल खान हे स्टेजवर आले तेव्हा मस्ती करत भारती सिंहनं शूरासोबत केलेल्या दुसऱ्या लग्नावरून अरबाजची मस्करी करण्यास सुरुवात केली. अरबाजनं त्याच्या लग्नात भारतीला बोलावलं नाही म्हणून ती त्याच्याशी मस्करी करू लागली. ज्यावर उत्तर देत अरबाज म्हणाला, 'काही नाही पुढच्या लग्नाला बोलवेन, हा कोणाच्या दुसऱ्याच्या...'
भारती सिंहनं पुन्हा एकदा सलमान खानशी अरबाजच्या लग्नावरून प्रश्न विचारला. भारती त्यावेळी म्हणाली की तू मोठा भाऊ आहेस तर लग्न करण्यावरून तू त्याला काही सल्ला दिला नाही का? तेव्हा सलमान मस्करी करत म्हणाला, अरबाज ऐकतचं नाही. जर ऐकलं असतं तर... सलमान खानचं अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावरून मिळालेलं हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय.
शूरा खानशी लग्न केल्यानंतर अरबाज खाननं त्याची एक्स पत्नी मलायका अरोराला इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केलं. हे एक्स कपल घटस्फोटानंतर त्यांच्यात असलेली मैत्री जपत होते. दोगं एकत्र मिळून मुलगा अरहानचा सांभाळ करायचे. कधी ते दोघं एकत्र विमानतळावर स्पॉट व्हायचे तर कधी त्याच्यासोबत बाहेर जेवायला जाताना दिसायचे. तर शूराशी लग्न केल्यानंतर अरबाजनं मलायकाला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू अनफॉलो केलं.
हेही वाचा : चारचौघात आई म्हटलं की चिडायची, स्वतःच्या मुलीला मारून टाकलं; आता सीरिज येतेय!
अरबाज आणि मलायकानं 1998 मध्ये लग्न केलं होतं. त्यातही हा प्रेम विवाह म्हणजे लव्ह मॅरेज होती 2016 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तर 2017 मध्ये ते अधिकृतपणे विभक्त झाले.
शूराशी विवाह कधी झाला?
अरबाज खाननं 24 डिसेंबर 2023 मध्ये शूराशी लग्न केलं. रिपोर्ट्सनुसार, अरबाजनं 19 डिसेंबर रोजी शुराला लग्नासाठी प्रपोज केलं. शूरानं देखील त्याला होकार दिला. त्यानंतर त्यांनी लगेच लग्न केलं. तर दुसरीकडे मलायका अरोरा आणि अर्जुन मलायकाच्या लग्नाची चर्चा रंगली होती. तर शूरा ही अरबाजपेक्षा वयानं 15 वर्षे लहान असून ती 41 वर्षांची आहे. ती एक पॉप्युलर मेकअप आर्टिस्ट आहे.