जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर सलमानचा व्हिडिओ समोर; एकच चर्चा...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या पत्रात अभिनेत्याचे वडील सलीम खान यांच्या नावाचाही समावेश आहे. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून अभिनेत्याचे चाहते म्हणू शकतील की सलमान खान अशा धमक्यांना घाबरणारा नाही. धमकीच्या या बातम्यांदरम्यान, सलमान खान एअरपोर्टवर स्पॉट झाला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान मुंबई एअरपोर्टवर दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सलमान खान मुंबई स्पॉट झाला आहे. व्हिडिओमध्ये तो निळ्या रंगाच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खानसोबत पोलीस दिसत आहेत.
दबंग खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सलमान खानच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं असून, त्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या सिक्योरिटी स्टाफच्या बेंचवर सापडलं. त्याच मार्गावर सलीम खान दररोज आपल्या सुरक्षा कर्मचार्यांसह मॉर्निंग वॉकसाठी जातात. जरी त्या ठिकाणी ते क्वचितच विश्रांतीसाठी थांबतात. दुसरीकडे हे पत्र सिक्योरिटी स्टाफच्या बेंचवर सापडल्याने खळबळ उडाली आहे.