मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा Salman Khan 'दबंग 3' Dabangg3 हा आगामी सिनेमा शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवस अगोदरच बुधवारी संध्याकाळी 'बॉयकॉट दबंग 3' (Boycott Dabangg 3)ट्विटरवर ट्रेंड होत होता. त्यानंतर सलमान खानने सिनेमासंदर्भात खूप मोठा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दबंग 3' हा सिनेमा सलमान खान फिल्म्स अंतर्गत असून प्रभू देवा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. यामुळे SKF च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलं असून त्याची माहिती दिली आहे. 



'दबंग 3' सिनेमातील 'हुड हुड दबंग...' सिनेमातील गाण्याला कडाडून विरोध होत आहे. या सिनेमातील गाण्यात साधू संतांना गिटार पकडून डान्स करताना दाखवलं आहे. काही लोकांनी गाण्यातील या दृष्याला विरोध केला होता. ज्यामुळे 'बॉयकॉट 3' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. अधिकृत केलेल्या घोषणेत ही दृश्ये काढण्यात आल्याच सांगण्यात आलं आहे. 



या अगोदर 29 एप्रिलला देखील #बॉयकॉट3 हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. हिंदू जागृतीच्या आव्हानाला नेटीझन्स रीट्वीट करत होते. साधु संतांना अशा प्रकारे दाखवल्यामुळे सिनेमाला विरोध होत होता.


तसेच 'दबंग 3' सिनेमा सर्वात अगोदर तेव्हा वादाभोवऱ्यात आढळला जेव्हा शुटिंग दरम्यान शिवलिंगावर झाकण्यात आलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर सिनेमाच्या वादाला सुरूवात झाली. तेव्हा देखील सलमान खानने स्पष्टीकरण दिलं की,'शिवलिंगाच्या सुरक्षेकरता अशी गोष्ट करण्यात आली.'