मुंबई : अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानला साप चावला. त्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काही तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली सलमानला ठेवल्यानंतर त्याला सकाळी 9 वाजता सोडलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पनवेल येथील फार्महाऊसवर रात्री सलमानला साप चावला. बिनविषारी साप असल्याने त्याच्या जीवावर बेतले नाही. उपचार घेवून सकाळी 9 वाजता सलमान खान परत आपल्या फार्महाऊस वर रवाना झाला. सध्या त्याची प्रकृती ठिक आहे.