मुंबई : बिग बॉसचा ११ वा सिझन ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या आठवड्यापासूनच हा सीझन वादामध्ये अडकला आहे. मात्र काही आठवड्यामध्येच या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीला सुरूवात झाली आहे.  


आज युट्युबच्या माध्यमातून चर्चेत आलेलं नाव 'ढिंच्यक पूजा' बिग बॉसमध्ये प्रवेश करणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून या खास एपिसोडची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. 



 


सलमान खानने 'ढिंच्यॅक पूजा'चे ' सेल्फी लेली मैने आज' हे गाणं गातच तिचे स्वागत केले. त्यानंतर हेच गाणं प्रेक्षकांनी हीट केलंय का ? असा प्रश्न विचारत 'काय मजाक आहे?...' असंही सलमान खानने विचारले आहे. 


पूजाची युट्युबवरची क्रेझ पाहून अशा गाण्यांची कल्पना तुला दोन वर्षांपूर्वी सुचली. तेव्हा तुझ्या डोक्यात काय पडलं होतं ? असे विचारत सलमान खानने पूजासोबत थोडी मजा-मस्करीदेखील केली आहे. 


अनेक दिवसांपासून 'बिग बॉस -११' मध्ये ढिंच्यॅंक पूजा येणार अशी बातम्या होत्या.  'आपण एका गाण्याच्या मेकिंगमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे बिग बॉसमध्ये एन्ट्री करायला उशीर झाला. पण दुसर्‍यांदा परत बिग बॉसकडून विचारणा झाल्यानंतर आता मी 'बिग बॉस' मध्ये प्रवेश करणार आहे.' अशी माहिती ढिंच्यॅंक पूजाने दिली आहे. 


बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 'ढिंच्यॅक पूजा'ने एक नवं गाणं तिच्या चाहत्यांच्या भेटीला आणले आहे. या गाण्याला सुमारे दोन दिवसांमध्ये दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.