बॉलिवूडच्या `या` अभिनेत्याच्या मुलीला सलमान खान करणार लाँच
कोण आहे ही मुलगी
मुंबई : सुपरस्टार सलमान खान बॉलिवूडमध्ये न्यूकमर्ससाठी देवदूत आहे. अनेक सेलिब्रिटी किड्सला सलमान खानने लाँच केलं आहे. सोनाक्षी सिन्हा, जरीन खान, स्नेहा उलाल, डेजी शाह, अथिया शेट्टी, आदित्य पांचोली सारख्या अनेक सेलिब्रिटी किड्सना लाँच केलं आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एक नवीन नाव जोडलं गेलं आहे. गेल्याच आठवड्यातच याची घोषणा केली. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला नवीन चेहरा मिळाला आहे. ती लक्की मुलगी आहे जिला सलमान खान लाँच करणार आहे. सलमान खान मोहनीश बहलच्या मुलीला प्रनुतन बहलला लाँच करत आहे.
प्रनुतनने सिनेमात करिअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत प्रनुतनने सांगितलं की, डेब्यू करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. तिला असा सिनेमा करायचा आहे ज्यामधून प्रेक्षक तिला लक्षात ठेवतील . सोशल मीडियावर प्रनुतन भरपूर अॅक्टिव्ह आहे. तिचे फॅन फॉलोइंग जास्त आहे. प्रनुतन सतत आपले फोटो पोस्ट करत असते. प्रनुतन आजी नुतन सारखी दिसत असल्याचं काही जणांच म्हणण आहे.
प्रनुतनला खूप अगोदरपासून ऑफर मिळत होत्या पण आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावरच आपण या क्षेत्राकडे वळायचं असा तिचा निर्णय होता. आता शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रनुतनने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचं ठरवलं आहे.