मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान काळवीट प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर आता सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो लवकरच एका टी.व्ही. रियालिटी शो मध्ये दिसणार आहे.
सलमान खान लवकरच एका दशकानंतर दस का दम हा रियालिटी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची शूटिंगही त्याने सुरु केले आहे. त्याने शो चे प्रोमो शूट केले आहे. सलमानच्या फॅन क्लब पेजने दस का दम च्या सेटवरील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान यासाठी जबरदस्त मानधन घेणार आहे. दस का दम चे दोन सीजन होस्ट केल्यानंतर तिसरा सीजन करण्याची सलमानची इच्छा होती. मात्र निर्मात्यांशी मानधनावरुन बोलणी सुरु होती.


सलमानला मिळणार इतके मानधन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, २६ एपिसोडच्या शूटिंगसाठी सलमान खान एकूण ७८ कोटी रुपये मानधन घेणार आहे. इतक्या दिवसांपासून या मानधनावरुन बोलणी सुरु होती. ती पक्की झाल्यानंतर शो पुन्हा सुरु करण्यात आला.


यानंतर प्रसारीत होईल हा शो


मात्र हा शो कोणत्या दिवशी प्रसारीत केला जाईल, यावर निर्माते विचार करत आहेत. यावेळेस स्क्रिप्टिंगमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी शो मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र यावेळेस यात फक्त सामान्य जनता सहभागी होऊ शकेल. आयपीएलची क्रेझ लक्षात घेता आयपीएलनंतरच या शो चे प्रसारण करण्यात येईल.