मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा चाहतावर्ग प्रचंड आहे. आज तो वयाची ५२ वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


फार्महाऊसवर पार्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान आपला बर्थडे कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण दरवर्षीप्रमाणे सलमान आपला बर्थडे त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. सलमान खान त्याच्या पनवेलमधल्या फार्महाऊसच्या बाहेर देखील आहे. सलमान मीडिया आणि त्याच्या फॅन्सला देखील भेटला.


या अभिनेत्रीसोबत दिसला दबंग


सलमान जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या सोबत कॅटरिना कॅफ देखील होती. सलमान खान आणि कॅटरिनाचा नुकताच टायगर जिंदा है सिनेमा रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर तो चांगली कमाई करत आहे. यावेळी या सिनेमाचे डायरेक्टर अली अब्बास देखील उपस्थित होते.


पार्टीला कोण-कोण येणार


सलमानच्या बर्थडे पार्टीला खान कुटुंबियातील सर्व सदस्य तसंच मलायका अरोरा, अमृता अरोरा, लूलिया वंतूर यांचीही हजेरी लागणार असल्याचं समजतंय. त्याचबरोबर बॉलिवू़डमधील काही खास आणि जवळचा मित्रपरिवार देखील भाईजानच्या बर्थडे पार्टीला उपस्थित राहणार आहे.