लंडन : 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे ५० दिवसांचे शेड्युल संपवून सलमान खान लंडनमध्ये पोहचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमध्ये 'दबंग टूर'साठी हिंदी सिनेमातील अनेक सेलिब्रिटी असणार आहेत. पण त्यांच्यासोबत खान कुटुंबीयातील काही व्यक्तीदेखील पोहचल्या आहेत. 


पहिल्याच दिवशी लंडनमध्ये सलमान आणि  त्याचा भाचा अहिलचा एक  खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ब्रेकफास्ट करताना सलमान आणि अहिल ऐकमेकांसोबत मज्जा मस्ती करताना दिसले. अहिल सलमान खानला काही तरी भरवण्याचा प्रयत्न करत होता. पण खट्याळ अहिलने सलामानला भरवण्याऐवजी तशी अ‍ॅक्शन करत तो घास स्वतःच्या तोंडात घातला. यानंतर सलमान, अहिक आणि तेथील इतर उपस्थित व्यक्तीदेखील हसत राहिल्या.  



 


सलमान खानचे लहान मुलांशी पटकन बॉन्डिंग होते. अहिलसोबत मज्जामस्तीचेही अनेक फोटो आणि व्हिडियो यापूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. 
'टायगर जिंदा है' याचित्रपटाच्या चित्रीकरणानंतर सलमान लवकरच 'रेस 3' या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. तसेच 'बिग बॉस सीझन ११' घेऊन सलमान छोट्या पदद्यावरही दिसणार आहे.