मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित 'भारत' येत्या दोन दिवसांत प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' ५ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमानचे अनेक चाहते या चित्रपटासाठी उत्साहित आहेत. परंतु प्रदर्शनाच्या आधीच चित्रपट अडचणीत सापडला आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका याचिकाकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्शन ३ नुसार, कोणत्याही प्रतिकाचा किंवा नावाचा व्यावसायिक उद्देशांसाठी वापर केला जाऊ शकत नाही. सलमानच्या चित्रपटाच्या नावामुळे या कायद्याचा गैरवापर करत त्याचं उल्लंघन केल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. या कायद्यानुसार, 'भारत' शब्दाचा प्रयोग व्यावसायिक उद्देशांसाठी केला जाऊ शकत नसल्याचं त्याने म्हटलंय.



'भारत'मध्ये सलमान खान वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. सलमान साकारत असलेली भूमिका त्याच्या तरुणपणापासून ते वृद्दावस्थेपर्यंतचा प्रवास दाखवणार आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना त्याची विविध रुपं पाहण्याची संधी मिळणार आहे. 'भारत'ची प्रदर्शनाच्या आधीच सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरु आहे. 'भारत'मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'भारत' साउथ कोरियन 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'ओड टू माय फादर'मध्ये १९५० ते २०१४ पर्यंतचा काळ एका व्यक्तीच्या नजरेतून दाखवण्यात आला होता.


'भारत'मध्ये सलमान, कतरिनासह बॉलिवूडमधील इतर कलाकारही दिसणार आहेत. दिशा पटानी, नोरा फतेही, वरुण धवन, जॅकी श्रॉफ, तब्बू आणि सुनील ग्रोवरही भूमिका साकारणार आहेत. 


'भारत'साठी दिग्दर्शकाला एक भारतीय चेहरा हवा होता. त्यामुळे कतरिना आधी प्रियंका चोप्राला हा रोल देण्यात आला होता. परंतु निकसोबत लग्न करण्यासाठी 'भारत'चं शूटिंग सुरु होण्याच्या ५ दिवस आधी प्रियंकाने चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे आता कतरिना चित्रपटात काय कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.