Fabulous lives of Bollywood wives seema sajdeh: सध्या नेटफ्लिक्सवर (Netflix) अनेक उत्तोमोत्तम वेब सिरिज आणि टिव्ही शोज हे येतेच असतात. अगदी लहान मुलांपासून ते गृहिणींपर्यंत तसेच अगदी वयस्कर लोकांपर्यंत सर्वचजण ओटीटीचे चाहते झाले आहेत. त्यातलाच एक शो सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतो आहे आणि तो म्हणजे 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'. (Fabulous lives of Bollywood wives) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटफ्लिक्सच्या शो 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या शोचा दुसरा सीझनही आला आहे ज्यामध्ये सीमा सजदेह, (Seema Sajdeh) महीप कपूर, (Maheep Kapoor), भावना पांडे (Bhavana Pandey) आणि नीलम कोठारी (Neelam Kothari) आहेत.


दुसरा सीझन खूपच मजेशीर असून हा सिझन सगळ्यांनाच आवडतो आहे. हा सिझन पहिल्या सिझनपेक्षा खूप बोल्ड आणि वेगळा आहे. नव्या सीझनमध्ये या अभिनेत्री आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक मोठे खुलासे करणार आहेत. दरम्यान सलमान खानचा भाऊ सोहेल खानची पहिली पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहने असे काही सांगितले की जे ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. 

सीमा टपरिया यांनी या शोच्या एका भागात पाहुण्या कलाकार म्हणून आल्या होत्या. सीमा टपरिया सीमा सजदेहशी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काही गुपितं विचारते. सीमा तापरिया यांनी सीमा सजदेहला पहिल्यांदा विचारले की तिने 22 वर्षांनंतर सोहेलला घटस्फोट का दिला? याला उत्तर देताना सोहेल खानची पहिली पत्नी सीमा म्हणते की त्यांचे विचार जुळत नाहीत. यावर सीमा टपरिया पुन्हा विचारतात की हे कळायला 22 वर्षे का लागली?

या प्रश्नाचे उत्तर देताना सीमा सजदेहने असे काही सांगितले जे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. ती गमतीने म्हणते की मला मुली आवडतात. तिचे बोलणे बोलून ती पण जोरात हसायला लागते. 


हा शो सध्या सगळीकडे जोरदार व्हायरल झाला आहे. यातून बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या पत्नींनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.