नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान याचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' चित्रपटात कतरिना कैफ, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवर प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सलमान खान चित्रपटाच्या टीझरमध्ये पाच वेगवेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीझरची सुरूवातच सलमानच्या एका दमदार डायलॉगने होते. 'अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि मेरा सरनेम क्या है, जाती क्या है, धर्म क्या है और मै उनसे मुस्कराकर कहता हूँ कि इस देश के नाम पर मेरे बाबूजी ने मेरा नाम भारत रखा। अब इतने बडे नाम के आगे जाति, धर्म या सरनेम लगाकर ना तो अपना और ना ही इस देश का मान कम कर सकता हूं।' सलमानचा हा डायलॉग जितका दमदार आहे तितकीच सलमानची एन्ट्रीही आणि त्याचा लुकही जबरदस्त आहे. चित्रपटात इतरही कलाकार आहेत परंतु टीझरमध्ये सममानची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. 



'भारत'चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर तो वायरल होत आहे. टीझरला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'ओड टु माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. यंदाच्या वर्षात भाईजान या चित्रपटाच्या रूपाने प्रेक्षकांना एक खास भेट देणार आहे. येत्या ईदला 'भारत' प्रदर्शित होणरा आहे.