हम रहें या ना रहें… अंगावर शहारे आणणारा Sam Bahadur चा ट्रेलर पाहिलात का?
विकी कौशलच्या आगामी `सॅम बहादूर` चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांकडून या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विक्की कौशलच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून लोकं हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. 'साम बहादूर' चित्रपटाच्या टीझरमध्ये विकी कौशलचा अभिनय पाहून लोक खूप प्रभावित झाले आहेत.
आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी विकी कौशलच्या आगामी 'सॅम बहादूर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांकडून या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'सॅम बहादूर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'सॅम बहादूर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या 2.43 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची 40 वर्षांची लष्करी कारकीर्द अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. विकी कौशलनेही फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेला न्याय दिला आहे.
विकी कौशलचा अभिनय खूप पसंत केला जात आहे. 'साम बहादूर'च्या ट्रेलरमधील दमदार संवाद आणि युद्धाच्या सीनने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानचा कसा पराभव केला हे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आलं आहे. सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लोकांना प्रभावित केलं आहे.
विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशल फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर फातिमा सना शेख भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'साम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. विकी कौशलचा चित्रपट 'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाशी टक्कर देणार आहे कारण हा सिनेमादेखील 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.