मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा अक्किनेनी या दिवसांमध्ये चर्चेत आहे. अलीकडेच, सामंथाने 'द फॅमिली मॅन 2' वेबसिरीजसह एक नवीन सुरुवात केली आहे. सामंथाने 2017मध्ये टॉलीवूड सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केलं. पण लग्नाआधीच सामन्था तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं होतं. पण आज आम्ही तुम्हाला सामंथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तिच्या चाहत्यांना माहितीच असेल;. होय, लग्नाआधी सामंथा दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण काही कारणांमुळे या दोघांचा ब्रेकअप झालं.



एक काळ असा होता की, सामंथाच्या आयुष्यात नागा चैतन्य नसून त्याच्या जागी एक दुसरा अभिनेता होता. आम्ही बोलत आहोत दक्षिणचा स्टार सिद्धार्थबद्दल. जेव्हा सामंथा आणि सिद्धार्थने एकमेकांच्या प्रेमात स्वत:ला अरेस्ट केलं होतं तेव्हा, ते इतके गंभीर होते की, त्याच्यासोबत लग्न करणार होते. असं म्हणतात की, श्रुती हासनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ सामंथा अक्किनेच्या प्रेमात पडला होता.


दोघांची पहिली भेट
एका वृत्तानुसार सामंथा आणि सिद्धार्थची पहिली भेट जबरदस्त चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ईथूनच हे दोघंही मित्र बनले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर हे दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसले.


सामंथा आणि सिद्धार्थच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत होती, मात्र या दोघांनी त्यांच्या नात्यावर कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. असं म्हणतात की, एका कार्यक्रमात सिद्धार्थने डान्स परफॉरमंस अप्रत्यक्षपणे अभिनेत्री सामंथाला डेडिकेट केला होता. त्यामुळे सामंथाला मोठा धक्का बसला होता. हा डान्स बघून सामंथा लाजली होती. यानंतरही या दोघांनी त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं. बातमीनुसार, दोघंही एकमेकांवर इतके गंभीर होते की, ते एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांचं नातं जवळपास अडीच वर्षे चाललं.



का तुटलं सामंथाचे हृदय? 
असं म्हणतात की, सिद्धार्थपासून विभक्त होण्याचा हा सामंथाचा निर्णय होता. एका बातमीनुसार, सिद्धार्थला सामंथाचे विचार आवडत नव्हते, सामंथाचा मनमोकळा स्वभाव आणि तिच्या कपड्यांवर सिद्धार्थचा आक्षेप होता. असं म्हटलं जातं की, त्याला सामंथाला स्वतःच्या मार्गाने ठेवायचं होतं, म्हणूनच हे दोघं वेगळे झाले.


नाव न घेता सिद्धार्थवर साधला निशाणा
सिद्धार्थपासून वेगळं झाल्यानंतर सामंथा अक्केनेनी एका मुलाखतीत सिद्धार्थचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला होता. सामंथा म्हणाली होती की, माझ्या वैयक्तिक आयुष्याची एक वेळी मी सावित्रीप्रमाणेच खूप त्रासात घालवली. नशीब मला नात्याच्या अगदी सुरुवातीलाच गोष्टी समजल्या आणि मी पुढे गेले. जेव्हा मला असं वाटलं की, काहीतरी वाईट घडू शकतं. पण आज मला