मुंबई : अभिनेत्री सामंथा (Samantha) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सामंथा आणि नागा चैतन्यने जेव्हा त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता सामंथाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे, हे जाणून तिचे चाहते नक्कीचं आनंदी होतील. सामंथाने मागचं सर्व काही विसरून आयुष्याला पुन्हा नव्याने सुरूवात केली आहे. तर आता सामंथा कोणती मोठी घोषणा करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथा रुथ प्रभू लवकरचं तिच्या आगामी चित्रपटाची शुटिंग सुरू करणार आहे. प्रॉडक्शन हाऊस ड्रिम वॉरियर पिक्चरने त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा आयकॉनिक चित्रपट ड्रीम वॉरियर पिक्चर्सचा प्रॉडक्शन क्रमांक 30 आहे. चित्रपटात अभिनेत्री सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता  सामंथाच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.



महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित शांतरुबन ज्ञानसेकरन करणार आहेत, तसेच हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  तेलुगू आणि तमिळमध्ये चित्रपट साकारण्यात येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या घोषणेसह समंथाचे पोस्टरही रीलिज केले आहे.


एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. इतर कलाकार आणि क्रूबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही. सामंथा लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.