मुंबई : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटापूर्वी साऊथ इंडस्ट्रीतील परफेक्ट कपलपैकी एक होते. कलाकारांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटावरून चाहते अजून बाहेर येत नाही तितक्यात, आता या अभिनेत्याला पहिली पत्नीही असल्याचं समोर आलं आहे. होय... समंथा रुथ प्रभूने स्वतः एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यच्या पहिल्या पत्नीबद्दल खुलासा केला होता. समांथाने सांगितलं होतं की, जेव्हाही ती नागासोबत रोमँटिक होऊ लागते तेव्हा त्याची पहिली पत्नी मध्ये येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समंथा रुथ प्रभूने 2019 मध्ये लक्ष्मी मंचू टॉक शोमध्ये नागा चैतन्यच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगितलं होतं. समंथाने तिच्या आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनाचं रहस्य उघड केलं आणि सांगितलं की, उशी ही नागाची पहिली पत्नी आहे. जर तिने त्याला किस केलं तर उशी त्यांच्यामध्ये असते. समंथाचं बोलणे टॉक शोमध्ये पुढे म्हणाली, मला वाटतं मी बरंच काही बोललो आहे.


समंथा रुथ प्रभू सध्या 'पुष्पा' चित्रपटातील ओ अंतवा या गाण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, समंथा रुथ प्रभूच्या आगामी चित्रपटांच्या बकेट लिस्टमध्ये अनेक मोठे चित्रपट आहेत. शकुंतलम आणि कथू वकुला रेंदू काधल या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत सामंथा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे, नागा चैतन्य आगामी चित्रपटाच्या वर्कफ्रंटवर नजर टाकल्यास, अभिनेता लवकरच करीना कपूर खान आणि आमिर खान यांच्यासोबत लाल सिंग चड्ढा या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.