मुंबई : समंथा रुथ प्रभू एक अतिशय सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आहे. 'पुष्पा : द राइज' चित्रपटातील तिच्या 'ओम अंतवा' या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी त्याने 5 कोटी रुपये घेतले होते. सामंथाने अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथाची लक्झरी लाइफ आणि नेट वर्थ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. समंथाने 'या माया चेसवे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. याशिवाय, ती साकी या फॅशन लेबलची मालक आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत घटस्फोटाची बातमी आल्यानंतर अभिनेत्रीने 200 कोटींची पोटगी नाकारली. तिने आज स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.


सामंथा आलिशान घरात राहते
सामंथा रुथ प्रभू हैदराबादच्या पॉश जुबली हिल्समध्ये राहते. समंथा रोज तिच्या घराचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.


आलिशान घराव्यतिरिक्त सामंथा रुथ प्रभूकडे जबरदस्त गाड्यांचं कलेक्शन आहे. तिच्याकडे BMW 3 Series, BMW X5 आणि Jaguar XFR सारख्या कारचं कलेक्शन आहे ज्याची किंमत करोडोत आहे. या सगळ्याशिवाय सुट्यांमध्ये नवनवीन ठिकाणी जायला सामंथाला आवडतं. ती तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुंदर ठिकाणं शोधण्याचा प्रयत्न करत असते.