मुंबई : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नितीन कुमार रेड्डी याने टॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून २० वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत त्याची मैत्रिण आणि सहअभिनेत्री समंथा रुथ प्रभूने त्याला खास संदेश पाठवला आहे. नितीनच्या 20 वर्षांच्या प्रवासावर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्यासाठी प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या आहेत. याशिवाय तिने नितीनला 'रॉकस्टार' म्हणून देखील संबोधलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं
2016 मध्ये रिलीज झालेल्या 'अ आ' चित्रपटात सामंथा रुथ प्रभू आणि नीतिन यांनी एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटातील नितीन आणि समंथा यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करणाऱ्या या चित्रपटासाठी सामंथाला 2017 साली फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.


नितीनने चाहत्यांचे मानले आभार 
नितीनने साऊथ चित्रपटसृष्टीत 2 दशके पूर्ण केल्याबद्दल आणि त्याचा पहिला चित्रपट 'जयम' रिलीज झाल्याबद्दल चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याने लिहिलं की, 'मित्रांनो, 20 वर्षांपूर्वी मी जयममधून माझा प्रवास सुरू केला, हा माझा पहिला चित्रपट होता. आज मला कसं वाटतं ते शब्दात सांगता येणार नाही पण मी प्रयत्न करेन.



सर्वप्रथम, मी तेजा गरूचे आभार मानू इच्छितो. त्याने मला पहिला ब्रेक दिला. प्रत्येक चित्रपटासाठी मी सगळे दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि संपूर्ण क्रू यांचे आभार मानतो. तुमच्याशिवाय मी आता जो काही आहे तसा नसतो. या सुंदर प्रवासासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे आणि आभारी राहिन. तुमच्या प्रेमाने मला पुढे नेलं.