मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या आगामी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. अनेक वेळा त्याचे सह-कलाकारासोबतचे फोटो  सेटवरून व्हायरल होत असतात. अलीकडेच, आमिर खान चित्रपटातील सहकलाकार नागा चैतन्यच्या घरी डिनरसाठी पोहोचला. डिनरचे आयोजन नागा चैतन्य आणि त्याचे वडील नागार्जुन यांनी हैदराबादमध्ये केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या खास क्षणाला साऊथ अभिनेत्री सई पल्लवीनेही हजेरी लावली. तर नागा चैतन्याची पत्नी सामंथा रूथ प्रभू या पार्टीत काही दिसली नाही. आमिर खान आणि साऊथ स्टार्सचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.



फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधीही शूटिंगदरम्यान आमिर खान आणि नागा चैतन्य यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. आजकाल नागा चैतन्य आणि सामंथा यांच्यात सर्व काही ठीक होत नसल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. 


नागा आणि सामंथा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले.  सामंथाने तिचे  अक्किनेनी हे आडनाव सोशल मीडिया हँडलवरून काढून टाकल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.