Samantha and Naga Chaitanya : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटानंतर सतत चर्चेत आहेत. त्यांचा घटस्फोट झाला असला तरी देखील त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे  असे वाटते. कारण 2021 मध्ये त्या दोघांनी अचानक घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा ही त्यांच्या चाहत्यांना न पटनारी होती. मात्र, आता या गोष्टीला दोन वर्षे झाले आहेत. सध्या समांथानं अभिनयातून ब्रेक घेतला असून ती तिच्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. तर दुसरीकडे नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाल यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागली आहे. नुकतीच नागानं एक अशी पोस्ट शेअर केली आहे जी पाहून समांथा आणि नागा चैतन्य एकत्र आल्याचे म्हटले जात आहे. 


नागाची इन्स्टाग्राम पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागा चैतन्यनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. नागा चैतन्यनं शेअर केलेल्या त्या फोटोत त्यांचा हॅश नावाचा बुलडॉग श्वान आहे. तो गाडीच्या बाहेर पाहत असून सुर्यास्त दिसत आहे. खरंतर हॅशला समांथा आणि नागा चैतन्य दोघं मिळून सांभाळत होते. पण विभक्त झाल्यानंतर समांथा ही हॅशला सांभाळत होती. आता नागा चैतन्यनं शेअर केलेले फोटो पाहुन एक गोष्ट लक्षात आली आणि ते दोघं मिळून श्वानची काळजी घेत आहेत. आता समांथा कामाच्या निमित्तानं लंडनला गेल्यानं नागा चैतन्य त्यांच्या या श्वानची काळजी घेत आहे. दरम्यान, नागानं शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे की ते दोघं पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. 



चाहत्यांनी केली नागा चैतन्य आणि समांथाकडे एक मागणी


नागा चैतन्यनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की को-पेरेंटिंग हॅश. दुसरा नेटकरी म्हणाला, 'प्लीज समांथासोबत पॅचअप करा, तुम्ही दोघं एकत्रच बेस्ट दिसतात.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'तुझ्या आणि समांथामध्ये पॅचअप झाला?'


हेही वाचा : आई नाही व्हायचंय...; Eggs Freeze करणारी 38 वर्षांची मराठमोळी अभिनेत्री असं का म्हणाली?


समांथा आणि नागा चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली असली तरी देखील त्यावर्षाच्या सुरुवातीला नागा चैतन्यनं एका मुलाखतीत खुलासा केला की घटस्फोट एक वर्ष आधीच झाला होता आणि आता एक वर्षापासून आम्ही कायदेशीरपणे विभक्त होत होतो.