मुंबई : साऊथ एक्ट्रेस समंथा रुथ प्रभूने आपल्या अदाकारीची जादू दक्षिणात्य सिनेमावर खूप चालवली आहे. संमथाचे चाहते फक्त दक्षिण भारतातच नाही तर हिंदी दर्शकदेखील आहेत. चाहते तिला नेहमी पडद्यावर पाहण्यासाठी उत्साहित असतात. आता अभिनेत्रीला एक मोठी ऑफर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापसी पन्नूच्या प्रोडक्शनमध्ये दिसू शकते समंथा
या दरम्यान एक बातमी समोर येत आहे की, समंथा लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री तापसी पन्नूच्या प्रोडक्शनमध्ये बनवला जाणारा आगामी सिनेमासाठी समंथाला संपर्क करण्यात आला आहे. तापसी पन्नूची आऊट साईडर्स फिल्म एक महिला केंद्रित थ्रिलर निर्माण करणारी आहे. 


आता हा थ्रिलर सिनेमासाठी कास्टिंग टीमने सामंथा रुथ प्रभूच्या मुख्य भूमिकेसाठी सुचवलं आहे. यावर अद्याप तरी कोणतीच पुष्टी नाही झाली. खरंतर समंथा आता आपला  पास्ट विसुरुन नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचं दिसत आहे. समंथा सध्या सुट्टीवर आहे. आणि  मैत्रीणीसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, समंथा लवकरच 'शकुंतलम'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तिच्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. याशिवाय ती विघ्नेश शिवनच्या 'कथुवकुला रेंदू कादळ'मध्येही दिसणार आहे.