मुंबई : सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉप सेलिब्रिटींमध्ये या चिमुकलीचे नाव सर्वात वर आहे, ही अभिनेत्री बालपणीच्या फोटोंमध्ये जितकी क्यूट दिसते, तितकीच ती मोठ्या पडद्यावरही क्यूट दिसते. या सुंदर मुलीने सध्या सगळ्यांचचं लक्षवेधलं आहे.


जर आपण साऊथ अभिनेत्रींबद्दल बोललो तर ही स्टार आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच तिचा एक सिनेमा खूपच गाजला आहे, ज्यामध्ये तिचे आयटम साँग लोकांना आवडले आहे.


हे गाणे गेल्या काही महिन्यांपासून सतत सोशल मीडियावर गाजत होते. बॉलीवूडचे मोठे सेलिब्रिटी देखील तिचे हे गाणे रिक्रिएट करताना दिसले.


आता साऊथच्या अभिनेत्रीचा हा बालपणीचा फोटो व्हायरल झाला,अनेकांना तिला ओळखणं कठीण झालं आहे. 


सध्या ही साऊथ अभिनेत्री तिच्या घटस्फोटामुळे सर्वाधिक चर्चेत होती. पतीसोबत घटस्फोटाच्या बातम्यांनंतर आता ही अभिनेत्री आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.



आता बहुतेक लोकांनी या अभिनेत्रीचे नाव ओळखले असेल. ही अभिनेत्री सध्या सगळ्यांची फेवरेट झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून समंथा रुथ प्रभू आहे.