मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सामंथाला मायोसिटिस (Myositis) नावाचा या दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे आता तिचे चाहते चिंतेत असल्याचं दिसतंय. काही महिन्यांपूर्वी मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार (samantha autoimmune condition) झाल्याची माहिती समंथाने दिली होती. त्यानंतर आता तिच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सामंथा तिच्या तब्येतीची खूप काळजी घेत आहे. नुकताच अभिनेत्रीचा यशोदा हा सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र या सिनेमाच्या प्रमोशनला देखील ती जाऊ शकली नाही यामागचं कारण म्हणजे सामंथाची तब्येत होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार सामंथाला आजारातून ठिक होऊन कामवर आता परतण्यासाठी वेळ लागणार आहे. 


सध्या सामंथा तिच्या हैद्राबादला तिच्या घरी आहे. बिघडलेल्या तब्येतीमुळे ती घरातूनही फार कमी बाहेर पडते. या आजारातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. सध्या डॉक्टरांनी अभिनेत्रीला कंप्लिट बेड रेस्ट सांगितला आहे. सध्या तरी अभिनेत्री कामावर लवकर परतेल असं वाटत नाही. कारण सामंथालाची ही ट्रिटमेंट २ ते ३ महिने चालू राहिल आणि या दरम्यान तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.


पाच प्रकारचे मायोसिटिस आणि त्यांची लक्षणे
मायोसिटिसचे पाच प्रकार आहेत: - डर्माटोमायोसिटिस, इन्क्लुजन-बॉडी, जुवेनाईल मायोसिटिस, पॉलीमायोसिटिस आणि टॉक्सिक मायोसिटिस.


दरम्यान, मायोसिटिस (myositis samantha) हा आजार दुर्धर आजार आहे. या आजारामुळे प्रचंड थकवा जाणवतो. शरिरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं हा आजार होण्याची शक्यता असते. विशेषता 30 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये हा आजार दिसून येतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पोषक आहार घेणं फायद्याचं ठरतं.


मायोसिटिसचा उपचार
मायोसिटिससाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. कॉर्टिकोस्टिरॉईड्स नावाच्या औषधांचा एक वर्ग डॉक्टरांनी लिहून दिला आहे. हा एक स्वयंप्रतिकार रोग असल्याने, इम्युनोसप्रेसंट औषधे देखील वापरली जातात. स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी  योगासन आणि व्यायाम करणं फायद्याचं ठरतं.