मुंबईः समंथा रुथ प्रभू ही तमिळमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा आज तिच्या करिअरमध्येही खूप यशस्वी आहे. चेन्नईत जन्मलेल्या समंथाने तेलुगु सिनेमातही काम केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तेलुगू सिनेमा Ye Maaya Chesave मधून तिने करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नागा चैतन्यसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. 



या चित्रपटातील त्याचा अभिनय इतका दमदार होता की लाखो लोक समंथाच्या सौंदर्याने मोहित झाले.


2017 मध्ये समंथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न केले. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे वेगळे झाले. याचं कारण अद्याप कोणालाही समजलं नाही मात्र समंथा अजूनही यातून सावरत आहे. करिअरमध्ये पुढे जात आहे. समंथा स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करते. 



समंथा आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात समंथाचा प्रवास



सिनेमात येण्यापूर्वी सुरुवातीच्या काळात समंथा आर्थिक संकटातून जात होती. अर्धवेळ नोकरी करून समंथा आर्थिक गरजा पूर्ण करत होती. समंथाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक एमआर रवी वरमन यांनी समंथाला पाहिलं आणि तिला सिनेमात संधी दिली. त्यानंतर समांथाने आयुष्यात मागे वळून पाहिले नाही.



समंथाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर नागा चैतन्यशी लग्न करण्यापूर्वी तिचं नाव 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थसोबत जोडले गेलं होतं. दोघेही अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण 2015 मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं.



 सिद्धार्थचं बाकीच्या मुलींसोबत जवळ येणं हे या ब्रेकअपचं कारण होतं.. समंथाला सिद्धार्थसोबत आयुष्यात सेटल व्हायचं होतं, पण सिद्धार्थची काही वेगळीच स्वप्नं होती. अशा परिस्थितीत दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आणि ते वेगळे झाले. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली कधीच दिली नाही.