Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यनं नुकताच अभिनेत्री शोभिता धूलिपालासोबत साखरपुडा केला. त्या दोघांच्या साखरपुड्याच्या बातमीनं सगळ्यांचे लक्ष वेधले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीकडे त्यांच्या काही चाहत्यांना आनंद झाला आहे तर काही चाहत्यांना हे पटलेलं नाही. नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाच्या साखरपुड्यानंतर आता समांथा रुथ प्रभूला लग्नासाठी प्रपोजल आलं आहे. त्यावर समांथानं तिची प्रतिक्रिया देखील दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर समांथाच्या एका चाहत्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं समांथाला लग्नासाठी प्रपोज केलं. हे इन्स्टाग्राम अकाऊंट मुकेश चिंता नावाच्या एका व्यक्तीचं आहे. या व्हिडीओत तो समांथाला हटके अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. सुरुवातीला तो समांथाचं घर शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं नाटक करतो. त्यानंतर तिला जीममध्ये जाऊन प्रपोज केल्याचं नाटक करतो. जीममध्ये तो रोमॅन्टिक अंदाजात समांथाला प्रपोज करतो असं दिसतय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओत मुकेश बोलतो की 'मी समांथाकडे जातोय, तिला हे सांगायला की तिला काळजी करण्याची काही गरज नाही कारण मी कायम तिच्यासोबत राहिनं. समांथाच्या घरी पोहोचल्यानंतर तो तिला शोधण्यासाठी जीममध्ये पोहोचतो. तिथे तो समांथाला लग्नासाठी प्रपोज करतो. त्यावेळी समांथाला प्रपोज करत तो तिच्याकडे दोन वर्षांची वेळ त्याला दे असं म्हणतो. त्यात मी सेटल होईल. पुढे लग्नासाठी प्रपोज करत म्हणाला, जर तू तयार असशील तर मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. प्लीज समांथा हो बोल. प्लीज...' 


हा व्हिडीओ शेअर करत मुकेशनं कॅप्शन दिलं की 'प्रयत्न केलाच नाही तर तुमची संधी हुकते.' दरम्यान, मुकेशच्या या व्हिडीओवर समांथानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिनं लिहिलं की बॅकग्राऊंडमध्ये दिसत असलेल्या जीममुळे मी जवळपास कन्विंस केलं होतं. मुकेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून समांथाची ही कमेंट शेअर केली आहे. त्यासोबत त्यानं कॅप्शन दिलं की जर संपूर्ण जग हे समांथाच्या विरोधात असेल तर मी तिच्यासोबत आहे. 


हेही वाचा : इंटिमेट सीनसंदर्भात ऐश्वर्याची रोखठोक प्रतिक्रिया! म्हणाली, 'मी केलेल्या Kiss ची किती...'


दरम्यान, समांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा नागा चैतन्यनं गेल्या साखरपुडा करत तो आयुष्यात पुढे जाणार असल्याचं दर्शवून दिलं आहे. त्यानं नागार्जुनच्या हैदराबाद येथे असलेल्या घरात साखरपुडा केला आहे.