लोकप्रियता मिळण्याआधी अशी दिसायची समांथा, व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही ओळख पटेना
Samantha Ruth Prabhu transformation : समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिची ट्रान्सफॉर्मेंशेन ही लक्ष वेधी आहे. तिच्या पहिल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Samantha Ruth Prabhu transformation : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुछ प्रभू ही चांगलीच चर्चेत असते. समांथाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा जुना व्हिडीओ आहे. तिचा या व्हिडीओतील लूक सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. तिचा हा लूक तेव्हाचा आहे जेव्हा ती फेमस नव्हती. तिला यावेळी पाहून ओळखनं खूप कठीण झालं होतं. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना आश्चर्य झालं आहे.
समांथाची ही जाहिरात 2007 मधील असल्याचं त्या व्हिडीओत म्हटलं आहे. समांथा ही कसली जाहिरात करत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर Ashika Thangamalikai असं एका दागिण्यांच्या दुकानाचं नाव असून त्याची जाहिरात करत आहे. या जाहिरातीत समांथानं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिनं दागिने घातले आहेत. तिची ही जाहिरात त्यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. इतकंच नाही तर त्यानंतर समांथानं मागे वळून पाहिलं नाही. समांथाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : Photo : राम चरणनं घेतलं मुंबईतील सिद्धिविनायकचं दर्शन
जाहिरात पाहताच ती समांथा नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे...
समांथांच्या पहिल्या जाहिरातीचा हा व्हिडीओ पाहताच एका नेटकऱ्यानं कमेंट केली की हा व्हिडीओ तिच्या करिअरच्या सुरुवातीचा आहे. समांथासाठी टाळ्या या झाल्याच पाहिजे, कारण तिचा प्रवास हा खूप चांगला असून ती आज खूप यशस्वी आहे. दुसरा नेटकरी म्हणाला की आता ती संपूर्णपणे वेगळी दिसते. तिसरा नेटकरी म्हणाला, माझा यावर विश्वास बसत नाही की ही तिची डेब्यू जाहिरात आहे. पदार्पणाच्या हिशोबानं तिनं खूप चांगला अभिनय केला आहे. काही नेटकऱ्यांनी तिला पाहिल्यावर लगेच कमेंट करत म्हणाले की तिनं प्लास्टिक सर्जरी आणि ओठांची सर्जरी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ती समांथा नाही हेच म्हटलं. त्यांनी थेट कमेंट करत म्हटलं की ही कोण आहे, ही आमची समांथा नाही.
समांथाचे प्रोजेक्ट्स
दरम्यान, समांथाचया कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी विजय देवरकोंडासोबत कुशी या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. तर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला असून तुम्ही घरी बसून याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय समांथा लवकरच 'सिटाडेल इंडिया' मध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत वरुण धवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.