`आपण पुन्हा भेटू,` नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांवर दु:खाचा डोंगर
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने पोस्टमध्ये मोडलेल्या ह्रदयाचा इमोजी टाकला आहे. आधीच अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या समाथांवर आणखी एक वाईट वेळ आली आहे. समांथा मागील अनेक काळापासून Myositis नावाच्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. नागा चैतन्यसह तिचा घटस्फोट झाला आहे. आपल्या संघर्षावर तिने अनेकदा जाहीर भाष्य केलं आहे. त्यात आता वडिलांचं निधन झाल्याने तिच्या दु:खात भर पडली आहे.
चेन्नईत राहणाऱ्या जोसेफ प्रभू आणि निनेट प्रभू यांच्या घरी समांथा प्रभूचा जन्म झाला होता. आपल्या पालनपोषण तसंच स्टारडमपर्यंतच्या प्रवासात आई-वडिलांनी किती मोलाची भूमिका निभावली आहे याबद्दल तिने नेहमी सांगितलं आहे. जोसेफ अँग्लो-इंडियन होते. समांथाच्या आयुष्यात त्यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली.
गलाट्टा इंडियाशी संवाद साधताना समांथा म्हणाली, "माझे संपूर्ण आयुष्य मला वैधतेसाठी झगडावं लागलं आहे. माझे वडील इतर भारतीय पालकांसारखे होते. त्यांना वाटतं की ते तुमचं रक्षण करत आहेत. ते तुम्हाला सांगतात- तुम्ही इतके हुशार नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितले - तू इतकी हुशार नाहीस". अभिनेत्रीने सांगितलं होतं की, आयुष्यभर व्हॅलिडेशनसाठी संघर्ष केल्यानंतर, जेव्हा तिची कामासाठी प्रशंसा होऊ लागली, तेव्हा ते खरे आणि योग्य कसं मानावं हे समजत नव्हतं. स्वीकारावे हे तिला समजले नाही.
समाथांच्या घटस्फोटाने वडिलांना बसला होता धक्का
2021 मध्ये समांथा प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर जोसेफ यांना वाईट वाटलं होतं. त्यांनी फेसबुकवर एक कविता लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "काही वर्षांपूर्वी एक गोष्ट होती. आता ती अस्तित्वात नाही. त्यामुळे आता नवी गोष्ट आणि नवा धडा सुरु करुयात," असं त्यांनी लिहिलं होतं.
नागा चैतन्य करतोय दुसरं लग्न
समांथा प्रभू आणि नागा चैतन्यचं ऑक्टोबर 2017 मध्ये लग्न झालं होतं. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता. पण चार वर्षातच दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. समांथापासून वेगळं झाल्यानंतर आता तीन वर्षांनी नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालासह लग्न करणार आहे. 4 डिसेंबरला नागा चैतन्य आणि शोभिता विवाहबंधनात अडकणार आहे.