Samantha Ruth Prabhu Fees: हिंदीच काय तर प्रादेशिक सिनेमांच्या हिरोईन्सच्या मानधनाबद्दल अनेकदा चर्चा केली जाते. सोबतच आता चर्चा आहे ती म्हणजे एका टॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीची. तिची दक्षिणेत चांगलीच क्रेझ असून तिच्याबद्दल अनेकदा लिहूनही येते सोबतच तिचा एक पुतळाही तयार केला आहे. इतकी प्रसिद्ध अभिनेत्री मानधनाच्या बाबतीच कोणाच्या कमी असेल का? तर हो शक्यता तर अगदी कमीच! परंतु सध्या या अभिनेत्रीच्या मानधनाबद्दल चांगलीच चर्चा रंगलेली आहे. बॉलिवूडच्याही अभिनेत्रींना हिनं मागे टाकलं असून मिनिटामिनिटाला ही अभिनेत्री कोट्यवधी रूपये कमावते आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्री या संपुर्ण चित्रपटात जरी दिसत नसल्या तरीसुद्धा त्या चित्रपटातील गाण्यांमुळेही अधिक लोकप्रिय होतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक नावं आहेत. करीना कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, बिपाशा बासू अशी अनेक उदाहरणं आहेत. तेव्हा फक्त आयटम सॉन्गनी या अभिनेत्री मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरल्या आहेत. दोन वर्षांपुर्वी आलेल्या 'पुष्पा' या चित्रपटातून 'उं अंतवा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यातून या गाण्यातून अल्लू अर्जून आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं तूफान डान्स केला होता. समांथा या चित्रपटात तर नव्हती परंतु तिच्या या डान्सनं तिच्या क्रेझमध्ये तूफान वाढ झाली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, समांथा रूथ प्रभूनं या गाण्यातून तब्बल कोट्यवधी रूपये कमावले होते. 


हेही वाचा - तब्बल 150 कोटी रूपये मार्केट व्हॅल्यू असलेली आलिया भट्टची कंपनी जाणार अंबानींच्या खिशात?


सध्या तिच्या या मानधनामुळे सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. IWMBUZZ नं दिलेल्या वृत्तानुसार, समांथानं या गाण्यासाठी तिनं 3 मिनिटांच्या एका गाण्यासाठी तब्बल 5 कोटी रूपये घेतले आहेत म्हणजेच 1 मिनिटाचे हे पैसे 1.7 कोटी इतके होतात. या मानधनाच्या आकाड्यामुळे ती देशातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. दीपिका पादूकोण, कतरिना कैफपेक्षाही तिच्या या डान्स नंबरनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 



याच रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की, सुरूवातीला समांखा रूथ प्रभु ही या गाण्याासाठी तयार नव्हती. सोबतच तिला या गाण्यातील काही डान्स स्टेप्सवर आक्षेप होता. परंतु अल्लू अर्जुनच्या हट्टाखारत तिनं हे गाणं करायला हो सांगितलं आणि ती तयार झाली. शेवटी या गाण्यात ती फार कम्फर्टेबल झाली आणि ती हे गाणं मनापासून पुर्ण केलं.