Samantha Ruth Prabhu Viral Video : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. सध्या समंथा ही तिचा आगामी चित्रपट 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच समंथा 'शाकुंतलम' या चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरंससाठी मुंबईत पोहोचली होती. यावेळा पापाराझी फोटो काढत असताना त्यांच्या लाइटमुळे समंथाला त्रास होत होता. तिनं सांगूनही पापाराझींनी ऐकले नाही. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समंथाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. व्हिडीओत समंथा ही प्रेस कॉन्फरंस अटेन्ड करण्यासाठी येताच तिच्या समोर पापाराझी आले. त्यावेळी समंथाला अस्वस्थ वाटू लागल्याचे दिसत आहे. पापाराझींनी फोटो काढण्यासाठी लावलेल्या फ्लॅशनं तिला अस्वस्थ वाटत होते. ती शांतपणे पापाराझींना फ्लॅशनं त्रास होत आहे तर बंद करा असं सांगताना दिसते. तरी देखील समंथा हसत त्यांना पोज देत होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


समंथाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तिच्या डोळ्यांना फ्लॅशचा त्रास होत आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, पापाराझींना तिच्या कंडिशनविषयी कळायला हवं त्यांनी फ्लॅश ऑफ करायला हवं. तिसरा नेटकरी म्हणाला, तिला Myositis.. Autoimmune हा गंभीर आजार आहे. लाइटमुळे तिला त्रास होतो. आणखी एक नेटकरी म्हणाला, यामुळेच मला ती आवडते. तिला बरं वाटतं नव्हतं तरी ती हसत होती. समंथाच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी पापाराझींना ट्रोल केलं आहे. 


हेही वाचा : Good News : Varun Dhawan होणार बाप? पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ समोर येताच एकच चर्चा


दरम्यान, समंथाला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं खुलासा केला होता. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की त्यातून बाहेर पडल्यानंतर पोस्ट शेअर करत ती याविषयी सांगणार होती पण त्याला खूप वेळ लागत असून तिनं आधीच त्या विषयी सांगितलं. 


समंथाला असलेला मायोसिटिस म्हणजे काय?


मायोसिटिस हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्नायू दुखणे, थकवा येणे, खाणे-पिणे आणि श्वा स घेण्यास त्रास होणे अशा अनेक समस्या होतात. तर पुरुषांपेक्षा महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो आणि मुलांवर याचा परिणाम होतो. यावर कोणतेही विशिष्ट औषधही नाही आहे. यावेळी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी योगासन आणि व्यायाम करणं फायद्याचं ठरतं.