मुंबई : अलीकडेच, अभिनेता वरुण धवन OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याच्या बातम्यांचा चर्चेत होत्या. वरुण धवनने Amazon Prime Video वर एक आगामी वेबसिरीज साईन केली आहे. ही वेब सिरीज अँथनी आणि जो रुसो यांच्या अमेरिकन ड्रामा सिरीज सिटाडेलची हिंदी आवृत्ती असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर या सिरीजमध्ये वरुणसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा सुरु होती. आता वरुणसोबत या थ्रिलर व्हेंचरमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू दिसणार असल्याचं समोर आलं आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.


वरुणसोबत स्क्रिन शेअर करणार 


रिपोर्टनुसार, या मोठ्या प्रोजेक्टमध्ये साऊथची अभिनेत्री समंथाला कास्ट करण्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, अभिनेत्रीने वरुणसोबत काम करण्यास हिरवा सिग्नल देखील दिला आहे आणि लवकरच ही सिरिज आणि त्यातील कलाकारांबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.



सिटाडेल ही अमेरिकन ड्रामा सिरिज भारतीय पार्श्वभूमी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित करणार आहेत. वरुण पहिल्यांदाच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, तर समंथाने यापूर्वी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'द फॅमिली मॅन 2' सिरिजमध्ये काम करून प्रशंसा मिळवली आहे.