मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार, अभिनेता नागा चैतन्य आणि त्याची Ex Wife समंथा रुथ प्रभू यांनी मागील वर्षीच वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाच्या चर्चांनी संपूर्ण कलाजगत हादरलं. नात्यातून वेगळं झाल्यानंतर समंथानं पुन्हा तिच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करण्याची सुरुवात केली, तर नागा चैतन्यसुद्धा त्याच्या आयुष्यात रमू लागला. (samantha ruth prabhus ex husband South indian Actor Naga Chaitanya New love Interest Actress revealed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता म्हणे पहिल्या अपयशी लग्नानंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एंट्री झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सध्या तो अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिला डेट करत आहे. 


हल्लीच त्या दोघांना नव्या घरात एकत्र पाहिलं गेलं. शोभिता आणि नागा या दोघांनाही एकत्र पाहिल्यानंतर लगेचच त्या दोघांमध्ये असणाऱ्या नात्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 


जुबली हिल्स येथे नागानं नवं घर खरेदी केलं. अद्यापही या घराचं काम पूर्ण झालेलं नाही. पण, तरीही शोभितासोबत त्याला इथं पाहिलं गेलं. यावेळी दोघंही एकमेकांसोबत अगदी सहजपणे वावरताना दिसले. नागा त्यावेळी शोभिताला त्याचं घर दाखवत होता.



सध्या समंथा या प्रकरणावर कशी व्यक्त होते यावरच सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान, शोभिता आणि नागा चैतन्यच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा या दोघांपैकीही कोणा एका कलाकाराची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या नात्याची बरीच चर्चा होणार हे मात्र नाकारता येत नाही.